भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासोबत वाद घातल्या प्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, काल सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी चिद्रवार यांनी टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबरमधील २०६ सर्वोदय छात्रालयाच्याजागेवरील सुरु असलेल्या बांधकामाची पाहाणी करण्यासाठी गेले होते. तेथे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चिद्रवार यांनी बाजारपेेठ पोलिस ठाणे गाठत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी चर्चा केली, झालेला प्रकार त्यांना सांगितला.
या अनुषंगाने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला तपास करीत आहे.