भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘ब्लॅका बोट्स’ संघ आयआयटी मुंबईच्या अत्यंत मानाच्या ‘ई- यंत्र’ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे.
राष्ट्रीय पातळीवर या स्पर्धेत संपूर्ण भारतातील रोबोटिक्स विषयात उत्सुक अभियंते भाग घेत असतात. अत्यंत कडक परीक्षण अंतर्गत एक एक फेरी स्पर्धकांना पार पाडावी लागते. सोहेल कच्ची, वैष्णवी चौधरी, साक्षी सपकाळे, दामिनी पाटील यांनी आयआयटी मुंबई येथे सहभाग नोंदवला होता. रोबोटिक्स तंत्रज्ञानातील मूलभूत ज्ञान व प्रतिमा पुथ्थकरण (इमेज प्रोसेसिंग) यांचा उपयोग करत मानवी जीवन उपयोगासाठी विविध संकल्पना साकारण्यासाठीचे ह्या स्पर्धेदरम्यान सांगितले जाते, आमच्या संघाने लेखी परीक्षा व प्रत्यक्षातील मॉडेल संकल्पना ह्या दोन्ही पातळीवर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले व उत्तर महाराष्ट्रातून पुढच्या फेरीसाठी पात्र झाले आहोत, पुढच्या वर्षी जानेवारीत उपांत्य व अंतिम फेरी आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टमध्ये होणार आहे. विजयी संघाला 4.5 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे, अशी माहिती संघ प्रमुख सोहेल कच्ची याने दिली.
प्राचार्य डॉ. आर.पी.सिंग, ॲकेडेमीक डीन डॉ. राहुल बारजिभे, विभाग प्रमुख प्रा. डी.डी.पाटील, प्रा.प्रिती सुब्रमण्यम, प्रा.वाय.एस.पाटील, प्रा.आर.पी.चौधरी, प्रा.ए.पी.इंगळे, प्रा.आर.ए. अग्रवाल, प्रा.ए. डी. पाठक यांनी सत्कार केला.