भुसावळ प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या कोरोना योध्दा सहाय्यता समितीच्या अध्यक्षपदी पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नि. तु. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या निर्देशानुसार प्रत्येक शहरात कोरोना योध्दा सहाय्यता समितीचे गठन करण्यात आले आहे. या अनुषंगाने खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळात ही समिती गठीत झाली. भुसावळ भाजप कोरोना योद्धा समितीचे अध्यक्ष म्हणून वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नी. तु. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीच्या उर्वरित सदस्यांमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक युवराज लोणारी यांच्यासह अमित असोदेकर, राहुल तायडे, अमोल महाजन, अनिरुद्ध कुळकर्णी, नंदकिशोर बडगुजर आदींचा समावेश आहे. तर या समितीला परीक्षित बर्हाटे, नगरसेवक युवराज लोणारी, माजी नगरसेवक प्रकाश बतरा, अजय नागराणी, महेंद्रसिंग ठाकूर, सतीश सपकाळे, राजेंद्र नाटकर, प्रा. दिनेश राठी, गिरीश महाजन, चंद्रशेखर इंगळे, मनोज बियाणी, राजेंद्र आवटे, संतोष बारसे यांचे सहकार्य राहील.
या समितीच्या माध्यमातून कोरोना संक्रमित अथवा संशयित रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात व उपचारांसाठी मदत केली जाणार आहे. यासोबत वाढीव बिल पडताळणी समिती, जीवन विमा समिती, अंत्यसंस्कार समिती आदींद्वारेही गरजूंना मदत केली जाणार आहे.