भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांचा चुकार कर्मचार्‍यांना दणका

0
22


भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी चुकार सफाई कर्मचार्‍यांसह मुकादमला निलंबीत केल्यानंतर संबंधीत खात्यातील कामावर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

भुसावळ पालिकेतील काही सफाई कर्मचारी आणि मुकादम हे आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे दिसून आले होते. आजवर त्यांच्या विरूध्द काहीही कार्यवाही होत नसल्यामुळे याचा शहरातील सफाईवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी कचर्‍यांचे ढिग साचले असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

या बाबींची दखल घेत, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी तीन सफाई कर्मचारी व एक मुकादमाला निलंबीत केले. यामुळे पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अन्य कर्मचारी व मुकादम हे आता नियमीतपणे काम करू लागल्याचे दिसून आले आहे.