जळगाव प्रतिनिधी । येथील सराईत गुन्हेगार निखील सुरेश राजपूत याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भुसावळ शहरातील वाढलेली गुन्हेगारी पाहता काही दिवसांपूर्वीच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी कडक कारवाईचे संकेत दिले होते. या अनुषंगाने शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी तसेच सराईत गुन्हेगार निखील सुरेश राजपूत (३५) याच्यावर निखील सुरेश राजपूत याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.
निखील सुरेश राजपूत याला आता एमपीडीएच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भुसावळातील गुन्हेगारी विश्वात यामुळे खळबळ उडाली आहे.