भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारात मटका जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करत 4 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर गोविंदा साळुंखे (वय-53) रा. गंगाराम प्लॉट आणि शेख नईम शेख गफुर (वय-45) या दोघेजण शहरातील आठवडे बाजारातील एका टपरीच्या बाजूला मटका जुगार खेळत असल्याची माहिती बाजार पेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संजय भदाणे यांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम-12 (अ)प्रमाणे कार्यवाही कारवाई करत दोघांना ताब्यात घेतल त्यांच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य व रोक रक्कम असा एकुण 5 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.