भुसावळातील महाजन परिवाराने दिली उत्तरकार्यानंतरच्या परंपरांना तिलांजली

भुसावळ प्रतिनिधी । लेवा पाटील उर्फ पाटीदार समाजात विविध प्रथा आणि परंपरा आहे. परंतु काळानुरूप काही प्रथा बंद करणे किंवा त्यात बदल केला पाहिजे अशा भूमिका लेवा समाजाची राहिली आहे. या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील महाजन परीवाराने उत्तरकार्यानंतर कपडे देण्याच्या प्रथेला तिलांजली दिली आहे.

या समाजात एखाद्या कुटुंबात कोणी मयत झाल्यास मयताच्या उत्तरकार्यानंतरच्या त्या परिवारातील महिलांना साळीचोळी आणि पुरुषांना कपडे घेण्याची प्रथा आहे. शहरात राम मंदिर वार्डातील महाजन वाड्यातील ह.भ.प. रामभाऊ हरी महाजन (आळंदी येथील खानदेश मठाचे माजी संचालक ) हे ५ रोजी देवाज्ञा झाले. त्यांचे उत्तरकार्य २५ रोजी पार पडले. या कालावधीत प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात आले. २५ रोजी सकाळी कीर्तनानंतर माईकद्वारे परिवारातील ज्येष्ठ सदस्याने लगेच या परिवारातील महिलांना साळीचोळी तसेच पुरुषांना कोणीही कपडे आणू नये. असा निर्णायक या परिवाराने आणि नातेवाईकांनी घेतला आहे. ही प्रथा समाजात आजपासून बंद केली जावी. या परिवाराने ही सुरुवात केली आहे. कोणीही ही प्रथा पाळू नये अशी सूचना करण्यात आली. साळीचोळीच्या कार्यक्रमाचे प्रसंगी करण्यात येणारे शिऱ्याचे व्यंजन मंगळवार लाच उत्तरकार्यात देण्यात येउन जुन्या परंपरेला तिलांजली दिली.

स्व. रामभाऊ ( रामदास) हरी महाजन यांचे संपूर्ण जीवन त्यागात गेले. त्यांनी स्वतःच्या विधवासुनेचा पुर्नविवाह करून देउन सख्या मुळी प्रमाणे तिची बिदाइ करुन समाजात आदर्श घालून दिला. आळंदी येथे वारकऱ्यांच्यासेवेसाठी मठ नियोजन व व्यवस्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या उत्तर कार्यला त्यांचा मुलगा दिलिप व सुन संगिताने चांगला निर्णय घेऊन त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली.

Protected Content