भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रेल्वेत नोकरीचे आमीष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्या प्रकरणी स्टेशन व्यवस्थापकपदी कार्यरत असणार्या अंकुश किरण मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकुश किरण मोरे ( रा. गणेश कॉलनी, मरीमाता मंदिराच्या मागे, भुसावळ ) हे सावदा रेल्वे स्थानक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रेल्वेत नोकरी लावून देतो व विवाहाचे आमीष दाखवून २९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले. मात्र, नंतर विवाह करण्यास नकार दिला.
यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून अंकुश मोरे विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट हे करत आहेत.