भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिका प्रशासन सेवेत समावून घेत नसल्यामुळे त्रस्त झालेले वाहन चालक अशोक मोटवाणी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
भुसावळ नगरपालिकेत 25 वर्षापासून काम कारणाऱ्या कायमस्वरूपी असलेल्या वाहन चालकास कोणतेही कारण नसतांना पालिका प्रशासनाने अचानकपणे 2010 मध्ये कामवरून काढल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पिडीत चालकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. औरंगाबाद उच्च न्यायालयाने चालकाच्या बाजूने निकाल असूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने अखेर चालकाने भुसावळ नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसले आहे.
भुसावळ नगरपालिकेचे कर्मचारी चालक अशोककुमार मेहरूमाला मोटवानी हे भुसावळ महानगरपालिकेत चालक म्हणून 1985 मध्ये लागले. 1987 मध्ये ते कायमस्वरूपीचे कर्मचारी झाले. 2010 पर्यंत अशी एकुण 25 वर्षे चालक म्हणून काम केले. मात्र अचानकपणे नगरपालिका प्रशासनाने कोणतेही कारण नसतांना अचानकपणे कामावरून कमी केले. आपल्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आल्यावर अशोककुमार मोटवानी यांनी भुसावळ नगरपालिका विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधिश ए.व्ही. गंगाधरवाला आणि ए.ए.धवाळे यांनी तक्रारदार अशोककुमार मोटवाणी याची बाजू समजून घेतल्यानंतर अशोक मोटवाणी यांच्या बाजूने निकाल दिला असून त्यांना त्वरीत कामावर घ्यावे असे निर्देश 11 एप्रिल 2018 रोजी भुसावळ नगरपालिका प्रशासनाला दिलेत. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातूनही 21 डिसेंबर 2018 रोजी या प्रकरणी पत्रव्यवहार झाला असता नगरपालिकेच्या उदासिन कारभाराची नाराजी व्यक्त केली असून मोघम स्वरूपाचा अहवाल तयार केले असल्याचे देखील पत्रव्यवहारात नमूद केले आहे. औरंगाबाद खंडपिठाचा निकाल आणि नाशिकच्या विभागीय आयुक्तांचे पत्रव्यवहार होवूनही भुसावळ नगरपालिका प्रशासनाची कोणतेही हालचाली होत नसल्याने अखेर गुरूवार 7 मार्च रोजी भुसावळ नगरपालिकेसमोर अशोक कुमार मोटवाणी न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषणाला बसले आहे.
पहा : अशोक मोटवाणी यांच्यावर नेमका काय अन्याय झालाय तो !