भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील गुन्हेगारवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने चार गुन्हेगारी प्रवृत्ती असणार्यांचे प्रस्ताव तयार केले आहेत.
शहरासह तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने कुख्यात गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यात अजून चार नव्या गुन्हेगारांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याला प्रशासनाने मान्यता दिल्यास हे चौघे हद्दपार होणार आहेत.
आगामी कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून या पार्श्वभूमिवर पोलीस प्रशासनाने चार गुंडांच्या हद्दपारीचे प्रस्ताव रवाना केले आहेत. हे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवले. तेथे मंजुरी मिळालेले प्रस्ताव भुसावळ प्रांतांकडे पाठवण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये चार जणांच्या हद्दपारीचे आदेश निघतील असे मानले जात आहे.