भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शारदा नगर परीसरात शतपावली करत असतांना दुचाकीने येवून अज्ञात दोन भामट्यांनी हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या दोघा भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून दोघांविरोधात भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पल्लवी निशिकांत देशमुख रा. भोळे कॉलनी, आदित्य अपार्टमेंट, भुसावळ हे 14 सप्टेंबर 2019 रोजी रात्री 9.30 जेवण झाल्यावर एकटे घराबाहेर परिसरात फिरण्यासाठी गेले असता संशयित आरोपी विकास भानुदास गोरख वय-19 आणि आकाश उर्फ लखन रमेश परदेशी वय-22 दोन्ही रा. कवाडे नगर, रेल्वे फिल्टर हाऊस जवळ भुसावळ हे दुचाकी वरून येवून धुमस्टाईलनुसार हातातील मोबाईल घेवून पसार झाले होत. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे परीसरात सापळा रचून दोघांना अटक केली. व त्यांच्या ताब्यातील दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करून दोघांविरोधात शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत एलसीबीचे पोनि बापु रोहोम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.बापु रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ विजय पाटील, अनिल इंगळे, सुरेश महाजन, नरेंद्र वारुळे, संतोष मायकल ,सुनील दामोदरे, रमेश चौधरी, दिनेश बडगुजर, मिलिंद सोनावणे स.फौ. अशोक महाजन यांनी भुसावळातून अटक केली.