भुसावळ प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक राजकीय पक्ष जोमाने कामाला लागला आहे. त्याचप्रमाणे भुसावळ विधानसभा मतदार संघाची आरक्षित जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटासाठी सोडावी, अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे करणार असल्याची माहिती रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजा कापसे यांनी आज तनारिका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यासाठी माहिती अशी की, माजी नगरसेवक पाणीपुरवठा सभापती तथा रिपाई जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ येथे आज जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित पत्रकार परिषदेत राजा कापसे बोलत होते की, भुसावळ विधानसभेची जागा एस्सीसाठी राखीव जागा असल्याने हि जागा बौद्ध उमेदवारांसाठी सोडावी. या मतदारसंघात बौध्द मतदारांची संख्या जास्त आहे. विधानसभेत आपला माणूस पोहला पाहिजे, अशी शहरवासीयांची अपेक्षा असल्याचे राजू सुर्यवंशी यांनी सांगितले. उमेदवारीसाठी राजू सुर्यवंशी व रमेश मकासरे यांची नावे चर्चेत आहेत. दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाल्यास एक दिलाने काम करू असेही राजू सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. मला उमेदवारी मिळाल्यास तालुक्यातील विकास कामे तसेच बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वचन बद्दल राहिल असे राजीव सूर्यवंशी यांनी यावेळी म्हटले आहे. भुसावळ विधानसभेची राखीव जागा असल्याने यावेळी ही जागा आम्हाला मिळालीच पाहिजे, यासाठी आमचे नेते रामदास आठवले यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजा कापसे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे, यांच्यासह असंख्य रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.