भुसावळ, प्रतिनिधी | महाजनादेश यात्रा काल येथे आल्यानंतर हॉटेल राधाकृष्ण मध्ये मुख्यमंत्री मुक्कामी होते. मात्र सकाळी त्यांची भेट घेण्यासाठी खोळंबलेल्या लोकांना न भेटताच ते पुढे रवाना झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर हॉटेलसमोर गर्दी केली होती मात्र पोलिसांनी सगळ्यांना भेटण्यास मज्जाव करून रस्त्याच्या बाजूला उभे केले. मुख्यमंत्री बाहेर येण्याची वाट पाहत अनेक नागरिक महामार्गाच्या कडेला उभे होते. मुख्यमंत्री बाहेर आले पण कुणालाही न भेटता यात्रेच्या रथात बसून बोदवडकडे रवाना झाले. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसून आली.