भुसावळ प्रतिनिधी । गणेश विसर्जन मिरवणुकीला येथे गालबोट लागले असून मिरवणुकीत दोन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला असून यातील एक माजी नगरसेवक यांचा पुत्र आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त राखला होता. मात्र रात्री पावणेदहाच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीतील वादामुळे दोन तरूणांवर चाकू हल्ला करण्यात आला. यात शिवमुद्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश इंगळे हे जखमी झाले आहेत. ते माजी नगरसेवक शांताराम इंगळे यांचे पुत्र तर माजी उपनगराध्यक्ष वासुदेव इंगळे यांचे पुत्र आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.