भुसावळ प्रतिनिधी । खासगी ट्रॅव्हल बस लुटण्याच्या तयारीत असणार्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी गजाआठड केले असून दोन आरोपी मात्र फरार झाले आहेत.

भुसावळ- बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या या पथकाने आरोपींना केली अटक.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडून येणार्या खाजगी ट्रॅव्हलला हातात तलवारी, गावठी कट्टा घेऊन लुटणाण्याच्याा बेतात काही तरुण असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. नहाटा कॉलेजच्या पुढे पाण्याच्या टाकी जवळ हे तरूण लपून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त बातमी बाजारपेठ चे निरीक्षक देविदास पवार यांना मिळाल्याने त्यांनी खात्री करून त्या ठिकाणी सापळा रचला. यात कलिम शेख सलिम, सुरेश राजू पवार उर्फे टकल्या,संदीप बुधा खंडारे, शुभम धनंजय साबळे, गोल्या शेख शरीफ (सर्व राहणार दीनदयाल नगर,भुसावळ) यांना अटक करण्यात आली.
याबाबत पो.कॉ. योगेश वामदेव माळी यांच्या फिर्यादी वरून दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी बाजारपेठ पोलिस स्टेशनला तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील दोन आरोपी फरार झाले आहे. त्यांच्या जवळून दोन तलवारी,गावठी कट्टा भा.द.वि.कलम ३९९,४०२,३४, २५(३),२५(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. तस्लिम पठाण,हे.कॉ.माणिक सपकाळे, संजय भदाणे,प्रशांत चव्हाण, कृष्णा देशमुख, योगेश माळी, गजानन वाघ,बापूराव बडगुजर, गुलबक्श तडवी,जितेंद्र सांळूखे, संदिप परदेशी,सुनील थोरात, सुनील जोशी,विनोद विटकर यांच्या पथकाने केली.