भुसावळातील जळीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील गजानन महाराज नगरातील महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

भुसावळ येथील गजानन महाराज नगरातील रहिवासी महिला मनिषा पाटील (वय २४) हिचा जळालेल्या अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या महिलेची प्राणज्योत मालविल्याने मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Protected Content