भुसावळ प्रतिनिधी । येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक स्व. बाबासाहेब नारखेडे यांच्या 39 व्या स्मृतीदिनानिमित्त के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उद्या शनिवारी (दि.21) विविध राज्यस्तरीय व आंतरवर्गीय स्पर्धाचे आयोजन शालेय प्रांगणात करण्यात आले आहे.
या उपक्रमात विद्यार्थ्यासाठी निबंधलेखन, वक्तृत्व व सुगमसंगीत स्पर्धा तर शिक्षकांसाठी कथा व काला स्पर्धा आणि लेखकांसाठी कथासंग्रह, काव्यसंग्रह व कादंबरी लेखन राज्यपुरस्कार इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि.21) रोजी सकाळी 8 वाजता सीमा भारंबे, माजी विद्यार्थीनी आणि साहित्यिका यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे पी.व्ही.पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी कार्यक्रमांतर्गत बालवैज्ञानिक स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, आय.टी.सॉफ्ट प्रयजन Elects. Vision आणि Power Point Presentation या आंतरवर्गीय स्पर्धाचे उद्घाटन अनुक्रमे संस्थागत मिलींद पी. पाटील, विजय गंगाळे, जी.सेक्रेटरी प्रमोद पी.नेमाडे, सभासद एस.पाचपांडे, सिध्देश व्ही.पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षिस वितरण सोहळा त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता प्रभाकर कॉलनीतील प्रभाकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या समारंभाचे अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निवास एस. नारखेडे हे भुषवतील. तर दि जळगाव पिपल्स को.ऑप बॅक लि. चेअरमन भालचंद्र पाटील यांच्यासह जळगावातील प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थिती असणा-या पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल अशी माहिती मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी दिली आहे.