Home Cities भुसावळ भुसावळात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी (व्हिडीओ)

भुसावळात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी (व्हिडीओ)

0
33
bhusaval paus
bhusaval paus

bhusaval paus

भुसावळ प्रतिनिधी । शहरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरात उकाडा निर्माण झाला आहे. या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. या पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाच्या या दमदार हजेरीमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. तसेच शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला असून पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र पावसाने अजून हजेरी लावावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनकडुन व्यक्त केली जात आहे. काल रात्री पासूनच पावसाने सुरुवात केली असून, पुन्हा सकाळी थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी दोन वाजता पावसाने सुरुवात केली आहे. पावसाला सुरुवात परंतू लाईट गुल होण्याच्या प्रमाणात वाढले असल्यामुळे नागरिकांमध्ये वीजवितरण बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound