भुसावळ प्रतिनिधी । येथील वार्ड क्र. 12 मध्ये आज (दि. 4 जुलै) रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी 50 झाडे लावण्यात आली आहेत. तसेच सायली हॉटेल मध्ये निसर्गाचे नियम बघत व प्राण्याचा दुष्काळ होत असला तरी निसर्गावर मात करण्यासाठी वार्ड क्र. 12 मधील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मात करण्यासाठी वार्डचे नगरसेविका पुजा सुर्यवंशी व माजी नगरसेवक राजू सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन रोपे लावून करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी ग.कॉ. शशिकांत निकम, से.नि. बॅक मॅनेजर अशोक सुरवाडे, इंगळे, मोहन ठाकूर, कुलदीप परदेशी, संजय चव्हाण, युसुफ शेख, सुनिल परदेशी, किशोर वानरखेडे यांनी सहभाग घेऊन श्रमदान केले. वृक्षारोपण कार्यक्रमात श्री.दे.ल.हिन्दी विद्यालय व सु.ग. हेमाणी विद्यालयाच्या एन.सी.सीचे विद्यार्थ्यांनी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन श्रमदान केले. त्यांना एन.सी.सी ऑफीसर आर.बी. इंगळे आणि आश्विनी बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.