भुसावळ प्रतिनिधी । शहरात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावलामुळे उदास झालेल्या शेतक-याला दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती अशी की, पावसाने मनासारखी हजेरी लावली असे नागरिकांनाकडून ऐकण्यास मिळत आहे. या पावसामुळे पाण्याच्या टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन शकते. तसेच रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना ही ह्या मोठ्या पावसाचा चांगलाच तडखा लागला आहे. या पावसामुळे डबक्यानमधे, खड्ड्यांमध्ये, नाल्यांमध्ये पाणी हे वाहात आहे. ओढ्यामधून गावचे पाणी हे वाहतांना यावेळी दिसत आहे. ह्या पावसामध्ये भिजत असणारे नागरिक कुठे आधार घेऊन पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. तसेच महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या वायफरचा उपयोग करून आपला मार्ग शोधत चालले होते. आजच्या झालेल्या पावसाने भुसावळकरांचे मन सुखावले असल्याचे नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे.