भुसावळ न्यायालयाच्या विस्तारासाठी १२ कोटी मंजूर

sawkare 1

भुसावळ प्रतिनिधी । येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या दोन वाढीव मजल्‍यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने शासनाकडे प्रस्ताव दिला होता. याचा पाठपुरावा आमदार संजय सावकारे यांनी नियमित सुरु ठेवल्यामुळे या प्रस्तावाला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवत ११ कोटी ९६ लाख ५५ हजाराच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या दोन वाढीव मजल्यांसाठी ८ कोटी १९ लाख ५ हजार ६०७ रुपयांतर्गत विद्युतीकरण ४० लाख ९५ हजार २८० रुपये, बाह्‍य विद्युतीकरण ४९ लाख १४ हजार ३३६ रुपये, पाणीपुरवठा व स्वच्छता ४० लाख ९५ हजार २८० रुपये, संरक्षक भिंत व प्रवेशद्वार १० लाख ४० हजार रुपये, रेन वॉटर हार्वेस्टिंग ५ लाख रुपये, अग्निशमन यंत्रणा व दुचाकी वाहनतळ १० लाख रुपये, आकस्मिकता निधी ३२ लाख ७६ हजार २२४ रुपये, अशा एकुण ११ कोटी ९६ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. भुसावळ न्यायालयात हजारो खटले प्रलंबित असून पक्षकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दोनच मजल्यांवर सर्व कामकाज होत असल्याने न्यायालयात प्रचंड गर्दी होत होती. अखेर उच्च न्यायालयाचा प्रस्ताव व आमदार सावकारे यांच्या पाठपुराव्याने वाढीव दोन मजल्यांचे कामास मान्यता मिळून लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

Protected Content