भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील नॉर्थ रेल्वे हायस्कूल केंद्रावर एका तरुणाने आपण केलेले मतदान दुसऱ्याच उमेदवाराला गेले असल्याचा आरोप केला होता. त्यावर केंद्र प्रमुखांनी test vote द्वारे तपासणी केल्यानंतर सदर आरोप खोटा निघाल्यामुळे संबंधित तरुणाविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, भुसावळ शहरातील नॉर्थ रेल्वे हायस्कूल बूथ क्रमांक 37 येथे सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मतदार अमोल रामदास सुरवाडे (वय 25) याने आपण मतदान केल्यानंतर VVPT मशिन मधून ज्या उमेदवाराला मत दिले, त्याची चिट्टी निघाली नसून खोटी चिट्टी निघाल्याचा आरोप केला. त्यावर सदर आरोप संदर्भात केंद्र प्रमुखांनी test vote द्वारे तपासणी केल्यानंतर सुरवाडे याचा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे योगेश्वर दिलीप चौधरी (केंद्र प्रमुख) यांच्या फिर्यादी वरून अमोल सुरवाडे याच्या विरोधात भुसावळ शहर स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यानुसार स्थानिक पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून आयपीसी 177 प्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, हि घटना वगळता जळगाव जिल्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.