जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात दुकानाचे कुलूप तोडून २ हजारांची चिल्लर आणि सिगारेट व तंबाखूचे पाकीट असा एकुण ८ हजार ७५० रूपयांचे मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार शनिवार पहाटे ३ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नाजीम खान वाजीत खान वय ४० रा. पिंप्राळा जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पिंप्राळ हुडको परिसरात किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शुक्रवारी २९ मार्च रोजी रात्री १० वाजता दुकान बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील २ हजारांची चिल्लर आणि सिगारेट पाकीट व तंबाखूची पाकीटे असा एकुण ८ हजार ७५० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी शनिवार ३० मार्च रोजी पहाटे ३ वाजता दुकान फोडल्याचे नाजीम खान यांना समजले. याप्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी हे करीत आहे.