शेंदूर्णी प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या जंगीपूरा येथील शाळेत दोन खोल्यांचे भूमिपूजन स्नेहदिप गरूड यांच्याहस्त करण्यात आले.
शहरापासून जवळ असलेल्या शेंदूर्णी-नाचनखेडा जिल्हा परिषद गटातील जि.प. सदस्या सरोजिनी गरुड यांच्या पाठपुराव्याने जंगीपुरा येथील शाळेला सदरचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या अंतर्गत जंगीपुरा या गावी दोन शाळा खोल्यांचे भूमिपूजन स्नेहदीप संजय गरूड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलतांना स्नेहदीप गरूड यांनी जिल्हा परिषद फंडातून सदर शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी लढतांना विकास कामांकडे पण पुरेपुर लक्ष देत आहे,नागरिकांनीही कोरोना निर्मूलनासाठी शासनाला सहकार्य करावे, सोशियल डिस्टन्स पाळावे, मास्कचा वापर नियमितपणे करावा भूमिपूजन कार्यक्रमात , सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, अरुण मोरे, इच्छाराम राजपूत, रमेश टाटू, भोला भाऊ राजपूत, रमेश राजपूत, ग्रामसेवक शरद घोंगडे, ठेकेदार गोंडू मोगरे व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



