चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथे प्रोत्साहन व सबलीकरण योजनेंतर्गत पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन तालुका कृषी अधिकारी यांच्याहस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता करण्यात आले.
तालुक्यातील बोढरे येथील नवक्रांती शेतकरी गटाला प्रोत्साहन व सबलीकरण योजनेच्या माध्यमातून पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले असून शासनाचे ६० टक्के अनुदान असणार आहे. तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे व अध्यक्ष महेंद्रसिंग राठोड यांच्याहस्ते आज १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता भुमिपुजन करण्यात आले. नियमांचे पालन करून यावेळी भुमिपुजन करण्यात आले. कृषी सहायक तुफान खोत व उत्तम निकम यांच्या प्रयत्नातून हे भव्य प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पामुळे गटशेतीला चालना मिळणार आहे. प्रकल्प मंजूर करण्यासाठी उत्तम निकम यांनी अथक परिश्रम घेतले आहे.
याबाबत सर्वस्तरातून त्याचे कौतुक होत आहे. उद्यास येत असलेला बोढरे गावातील पशुखाद्य निर्मिती प्रकल्प हा कदाचित तालुक्यातील पहिला भव्य प्रकल्प असेल. या प्रकल्पाने काही प्रमाणात बेरोजगारांची समस्या संपुष्टात येणार आहे. भुमिपूजना प्रसंगी तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्रसिंग राठोड, कृषी विभागाचे सुपरवायझर सैंदाने, कृषी सहायक तुफान खोत, पोलिस पाटील राजेंद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र परदेशी, गटाचे अध्यक्ष गोकुळ जाधव, उत्तम निकम, शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भिमराव जाधव, लोंजे येथील बळीराम राठोड, भाडेतत्त्वावर जमीन प्रकल्पास दिली असे शेतकरी भिमा वना सुपडू आदी उपस्थित हो