Home Cities धरणगाव पिंप्री येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पिंप्री येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन


पिंप्री खुर्द, तालुका धरणगाव ( वार्ताहर ) शासनाच्या ‘ आमचा गाव आमचा विकास ’ योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीना 14 व्या वित्त आयोग निधीतून गावातील धनगर गल्ली भागात पेव्हर ब्लॉक रस्ता कामाचे भूमिपूजन आज जि. प. सदस्य गोपाल बापू चौधरी तसेच येथील महिला सरपंच सौ. योगिता सूर्यवंशी उपसरपंच राजु बिजबिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी या गल्लीतील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेले चांग्या पाच्या महाराज मढीत जाऊन नानाभाऊ बडगुजर यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून पूजा करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. योगिता सूर्यवंशी उपसरपंच राजू बिजबिरे, माजी सरपंच सरलाबाई बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य अरुण पवार, मनोज पांडे, इंदुबाई चौधरी, सोनवणे, सुभाष धनगर, दत्तु धनगर, भगवान धनगर, भिका धनगर, यशवंत चौधरी यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound