महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते रस्ते, गटार कामांचे भूमिपूजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेशनगर भागातील बाबा हरदासराम सोसायटीत दलितेत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गत एक कोटी 20 रुपये खर्चाच्या रस्ते व गटारींच्या कामांचे आज (दि.१० ) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

नगरसेवक धीरज सोनवणे यांनी या कामांच्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या भागातील रस्ते तसेच गटारींच्या कामाला आता सुरूवात होणार असल्याने परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे ऊर्फ राजूमामा, माजी महापौर तथा नगरसेविका भारती सोनवणे, भाजप गटनेते भगत बालाणी, महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, पांडुरंग ऊर्फ बंडूदादा काळे, नगरसेविका अ‍ॅड.शूचिता हाडा, मंगला चौधरी यांच्यासह हरिष तोलानी, श्यामलाल कुकरेजा, राजू अडवाणी, रमेश कुकरेजा, रोहित कटारिया, मुकेश रावलानी, जीवतराम पोपली, सुरेश कुकरेजा, चंदीराम तलरेजा, हरिष मतानी, पुरुषोत्तम नाथानी, कुणाल रावलानी, नंदलाल कटारिया, राजेश तलरेजा, सुशील हासवानी, परमानंद हेमनानी, गोविंद बजाज, वरुण रावलानी, हर्षद अडवाणी, शंकर तलरेजा तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content