Home Cities अमळनेर नंदगावात राममंदिर सभामंडपाचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदगावात राममंदिर सभामंडपाचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

0
35

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव येथील पंचक्रोशीचे धार्मिक स्थळ असलेल्या राममंदिरच्या सभामंडपाचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अंदाजित ७ लक्ष रुपये किंमतीच्या सभामंडपामुळे मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण होऊन गावाच्या विकासात भर पडणार आहे. यावेळी प.पू. ईश्वरदासजी महाराज(राममंदिर), सरपंच मंगलाबाई पाटिल, रमेश पाटील, पृथ्वीराज पाटील, खुशाल पाटील, सुभाष पाटील, शरद पाटील, लोटन पाटील, मोतीलाल पाटील, भानुदास पाटील, युवराज पाटील, बाळा पवार, पप्पू पाटील, किशोर पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 


Protected Content

Play sound