जळगाव प्रतिनिधी । भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. तरूणाला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून याबाबत अद्यापपर्यंत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टी असल्याने मित्रांसोबत आलेला सत्यम राजेंद्र पाटील (वय-18) हा शिवकॉलनीकडून प्रभात कॉलनीकडे दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीएस 126) ने जात असतांना रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मागून येणाऱ्या गॅस कंटेनर क्रमांक (जीजे 06 एएक्स 5090) ने जोरदार धडक दिली. यात सत्यम हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर चालकासह गॅस कंटेनर जिल्हा पेठ पोलीसात जमा करण्यात आले आहे. गॅस चालक मोबीन खान माहम्मद अय्यूब (वय-30) मानधाटा, ता. पट्टी जि. प्रतापगड (उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अद्यापपर्यंत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.