Home Cities जळगाव भोरगाव लेवा पाटीदार पंचायतीतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतीतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळसे, जळगाव विभागाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी एका भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्रीरक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवावा, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांची उपस्थिती :
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक ललितदादा पाटील होते. कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये आमदार राजूमामा भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महापौर दीपमाला काळे, प्रा.पी.आर. चौधरी, संजयदादा राणे आणि विष्णू भंगाळे यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित सदस्यांचे कौतुक केले.

नामदार रक्षाताई खडसे यांचे प्रतिपादन :
सत्कारमूर्तींना शुभेच्छा देताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या की, “लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जनतेचा विश्वास संपादन करणे ही मोठी जबाबदारी आहे. लेवा पाटीदार समाजातील तरुण आणि अनुभवी लोकप्रतिनिधींनी शहराच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटून काम करावे.” यावेळी त्यांनी सर्व नगरसेवकांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उत्साहात संपन्न झाला सोहळा :
भोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळसे विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी देखील या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमामुळे समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. **


Protected Content

Play sound