शिंदाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन

bhumipujan

 

पाचोरा प्रतिनिधी । तालूक्यातील शिंदाड येथे दि. ९ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन पिंपलगावातील जि.प सदस्य मधुकर काटे, पंचायत समिती सभापती बंसीलाल पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासन जि.प. आरोग्य विभाग जळगाव यांच्याकडून २ कोटी ५३ लाख रुपये प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. नागरिकांना आरोग्याबाबत अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

भूमिपूजन प्रसंगी माजी पं.स. सभापती सुभाष पाटील, कृ.उ.बाजार समिती संचालक नरेंद्र पाटील, प्रदीप पाटील, अरुण तांबे, माजी सरपंच कैलास पाटील, दत्तात्रेय पाटील, ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ, दिगंबर पाटील, अशोक चौधरी, नामदेव पाटील, धनराज पाटील, प्रताप लोधी, केशव पाटील, शांताराम बोरसे, इंदल परदेशी, कॄष्णा धनगर, दशरथ पाटील, अरुण पाटील, पी.पी.पाटील, अनिल कोठवदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर पाटील, स्वप्निल पाटील, विजय पाटील, राजू तड़वी, काशीनाथ चौधरी, दिनेश पाटील, अरमान बेग, प्रदीप बोरसे, बालू श्रावने, विजय पाटील, विकास पाटील आणि महादु पाटील यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content