भिवंडी वृत्तसंस्था । येथे पहाटे तीनच्या सुमारास एक तीन मजली इमारत कोसळली असून यात पाच जण ठार झाले असून अनेक जण अडकून पडल्याची भिती व्यक्त होत आहे.
भिवंडीमध्ये पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर २०-२५ जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
भिवंडीतील पटेल कंपाऊंडमध्ये दुर्घटना घडली. एनडीआरएफचा चमू घटनास्थळी पोहचला असून त्यांनी किमान २० जणांनी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. तर अजूनही अनेक जण ढिगार्याखाली अडकून पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सुध्दा घटनास्थळाकडे धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.