Home Cities अमळनेर अ.भा.ग्राहक पंचायतीच्या जिल्हा कार्यकारिणीवर भीमराव महाजन यांची निवड

अ.भा.ग्राहक पंचायतीच्या जिल्हा कार्यकारिणीवर भीमराव महाजन यांची निवड


 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भीमराव महाजन यांची अ.भा.ग्राहक पंचायतीच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य विकास महाजन यांनी ही निवड घोषित केली आहे.

 

9e580503 db1a 4e06 8861 7eea267bb006

अमळनेर येथे झालेल्या तालुका बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. बैठकीस जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सतिष देशमुख,मकसूदजी बोहरी, ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक राजेंद्र सुतार,सह संघटक बापू चौधरी, सचिव विजय शुक्ल,महिला आघाडी प्रमुख प्रसिद्ध विधिज्ञा भारती अग्रवाल, ताहाभाई बुकवाला,खादीर सादिक,पत्रकार जयंतीलाल वानखेडे,सुनील वाघ,सुधा शिंदे,मीना अग्रवाल,वनश्री अमृतकर, उर्मिला अग्रवाल,योगेश पाने, भाऊ घासकडबी,विजय पारख यांच्या सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भीमराव महाजन यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल राज्य अन्न आयोग व ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष (मंत्रिस्तरीय) मा.ना.अरुण देशपांडे,प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड,जिल्ह्यातील ग्राहक पंचायतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound