छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याने, भाऊजीने डोक्यात दांडा मारुन मेहुण्याचा खून केल्याची घटना कन्नड तालुक्यातील करीमनगर येथे घडली आहे. ही घटना १३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की संशयित त हसनुद्दीन मोईद्दीनशेख हा त्याचा मेहुणा हुसेन हारून शेख शहरातील करीमनगरात शेजारी राहतात. संशयिताचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी भांडत होत असे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून संशयिताचे पत्नी आपल्या मुलांना माहेरी आईवडिलांकडे गेली होती. संशयिताच्या मुलाच्या हाताचे हाड मोडल्याने तो आपल्या आईसह मुलाना भेटण्यासाठी पत्नीच्या घरी सोमवारी गेला होता. त्याचवेळी दोन्ही कुटुंबात जोरदार भांडण झाले. शेजारच्या नागरिकांनी भांडण सोडवले. त्यानंतर संशयित शेख घरी गेला व पुन्हा दांडा घेऊन सासरी आला. रागाच्या भरात हसनुद्दीन याने त्याचा मेहुणा हुसेन हारून शेख याच्या डोक्यावर दांड्याने वार केला. नातेवाइकांनी कन्नड ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर हसनुद्दीन फरार झाला होता. मात्र कन्नड शहर पोलिसांनी १२ तासांत त्याला अटक केली.