भास्कर जाधव यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश

bhaskar jadhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार व दिग्गज नेते भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

 

यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. भास्कर जाधव यांनी आज ठरल्याप्रमाणे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. मी मूळचा शिवसैनिक आहे. माझा आंतरात्मा मला स्वस्थ बसू देत नव्हता. आपण शिवसेनेत काम केले पाहिजे असे आतून वाटत होते. त्यानुसार मी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला,’ असे जाधव यांनी यावेळी सांगितले. तसेच जी गोष्ट मी कधी केली नाही त्याचा मी कधी खुलासा करत नाही. ज्यावेळी मी शिवसेना सोडली मी मिलिंद नार्वेकर यांच्यावरमुळे शिवसेना सोडली असे म्हटले नाही. मी कधीही त्यांच्यावर आरोप केला नाही, असे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.

Protected Content