शेंदुर्णी प्रतिनिधी । शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या आप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी भारती सूर्यवंशी ही क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मार्च-एप्रिल 2020 च्या बी. कॉम. या पदवी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मार्च-एप्रिल २०२० च्या अंतिम वर्ष पदवी-पदव्युत्तर परीक्षा गुणवत्ता यादीत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. भारती श्रावण सूर्यवंशी ही सर्व सामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनी बी. कॉम. या पदवी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सर्वप्रथम आल्याबद्दल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, सचिव सतीश चंद्र काशिद, जेष्ठ संचालक सागरमल जैन, महिला संचालिका उज्वलाताई काशिद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील, उपप्राचार्य डॉ श्याम साळुंखे आणि इतरांच्या प्रमुख उपस्थित भारती आणि तिची आई सौ. मीराताई सूर्यवंशी यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला यासह महाविद्यालयीन पुरस्कारांच्या यादीतील तब्बल आठ विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रशासकीय तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक सतीश बाविस्कर आणि मुख्य लिपिक हितेंद्रकुमार गरुड यांनी भारती हिस सन्मानित केले.
या गुणवंत सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक सागरमल जैन यांनी आपल्या मनोगतातून कु. भारती हिचे कौतुक करत तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात तर सचिव सतीश काशिद यांनी आपल्या मनोगतातून भारती हिने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक आणि अभिनंदन करत तिचे आभार मानलेत कारण भारती हिच्या यशाने फक्त भारतीचेच नाहीतर, महाविद्यालय आणि संस्थेचे नाव विद्यापीठ परीक्षेत्रात प्रसिद्धीस आले यासह त्यांनी भारती हिस भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत तिला पुढील शैक्षणिक तथा करिअरकरिता आवश्यक आर्थिक मदत करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी भारती या सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च यशाबद्दल भारती सह कुटुंबियांचे आणि गुरुजणांचे अभिनंदन केले यासह तिला तिच्या शैक्षणिक वाटचालीस आवश्यक ती मदत करण्याचे जाहीर केले.
याप्रसंगी कु. भारती हिने, संस्था, महाविद्यालय आणि गुरुजणांचे ऋणनिर्देश करत गुरुजणांनी तिच्या इथपर्यंतच्या प्रवासात केलेले मार्गदर्शन आणि मदत यामुळेच हे यश संपादन करणे सोपे झाल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमात ज्यांनी भारती हिस या यशापर्यंत पोहोचण्यास मदत आणि मार्गदर्शन केले त्या गुरुजनांपैकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. श्याम साळुंखे आणि डॉ वसंत पतंगे यांचा प्रतिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांनी केले, त्यांनी आपल्या प्रस्तविकातून भारती हिची शैक्षणिक वाटचाल, तिने विद्यापीठ परिक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयाच्या तुलनेने मिळविलेल्या यशाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ महेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ वसंत पतंगे यांनी केले.याप्रसंगी धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश काशिद यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन प्रसंगी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने राजेंद्र संदानशिव यांनी शुभेच्छा दिल्यात. धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतिश काशिद यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा देखील साजरा करण्यात आला.यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.