जामनेर (प्रतिनिधी) भारतात निवडणूक प्रक्रियेत ई.व्ही.एम.च्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र ई.व्ही.एम.द्वारे पारदर्शकपणे निवडणूक होत नसल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या तालुका शाखेच्या वतीने आज (दि.१७) येथेधरणे आंदोलन करण्यात आले.
भारिप बहुजन महासंघातर्फे राज्यात ‘ई.व्ही.एम.हटाओ, देश बचाओ’ असे आंदोलन केले जात आहे. ई.व्हि.एम.मशीनवरील निवडणूक प्रक्रियेवर पुर्णतः बंदी आणून, आगामी निवडणूका या बँलेट पेपरच्या माध्यमातून पार पाडाव्या, अशी मागणी करण्यात येत आहे, याबाबत न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, वैभव सुरवाडे, ज्ञानेश्वर जोहरे, आकाश इंगळे, अनिल सुरळकर, पुंडलिक नेरकर, परमेश्वर जंजाळे, सुनील सुरवाडे, अजय सुरवाडे, उत्तम इंगळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.