भरधाव कारची दुचाकीला धडक; भाऊबहिण जागीच ठार

वरणगाव प्रतिनिधी । ट्रक दुचाकी अपघात दोन तरूण ठार झाल्याची घटना ताजी असतांना त्याच महामार्गावर भुसावळ तालुक्यातील बोहर्डी फाट्यावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील बहिण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सायंकाळी घडली.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील दाताळा येथील बहिण पुजा विनोद कोळी आणि भाऊ दुर्गेश विनोद कोळी हे दुचाकीने भुसावळहून राष्ट्रीय महामार्गाने रावेर तालुक्यातील दाताळा गावाला दुचाकीने आज सायंकाळी घरी जात असतांना. भुसावळ तालुक्यातील बोहर्डी फाट्याजवळ ऑर्डनर्स फॅक्टरीकडे वळत असतांना मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने येणारी स्विप्ट कारने जोरदार धडक दिल्याने बहिण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वरणगाव पोलीस अपघाताची नोंद करण्यात आली असून वरणगाव पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

 

Protected Content