जळगाव,प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने शरद पवार यांना “जय श्री राम” “जय श्री राम” लिहिलेले २००० पत्रक पाठविण्यात आले.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार नाही. असले वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून “जय श्री राम” लिहिलेले २ हजार पत्रक .खा.शरद पवार यांच्या मुंबई येथील जे ४५, सिल्व्हर ओक भुलाबाई देसाई रोड ४०००२६ या राहत्या घरी पाठविण्यात आले. तसेच पुढील दोन दिवसात भाजपा युवा मोर्चा मंडला मार्फत २० हजार पत्रक जळगाव शहरातून पाठविण्यात येईल.यावेळी जिल्हा महानगर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे , सरचिटणीस मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहुल लोखंडे, राहुल मिस्त्री, विक्की सोनार, स्वामी पोतदार, चिटणीस प्रतिक शेठ, रोहित सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, पुष्पेंद्र जोशी, जयंत चव्हाण आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/783110695765345/