भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशाचे पूर्व पंतप्रधान,भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची भारतीय जनता पार्टी भुसावळ तर्फे ९९ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे व शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण त्यांना अभिवादन केले. तसेच त्यांचा जयघोषाच्या घोषणा दिल्या.सदरील कार्यक्रम सुरभी नगर येथे आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला.यावेळी भारतीय जनता पार्टी प्रज्ञावंत आघाडीचे प्रा.विलास अवचार यांनी स्वर्गीय अटलजींच्या आयुष्यावर व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल उपस्थितां समोर विचार मांडले.
कार्यक्रमास विधानसभा निवडणुक प्रमुख संजय पाटील, जिल्हा सचिव भालचंद्र पाटील, विस्तारक रमाशंकर दुबे, प्रमोद सावकारे, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर,राजेंद्र आवटे,मनोज बियाणी,बापू महाजन, किरण कोलते, ॲड बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, गिरीश महाजन, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, रवी सपकाळे,पवन बुंदेले, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, उपाध्यक्ष प्रशांत देवकर, चेतन बोरोले, प्रा प्रशांत पाटील, चिटणीस प्रसन्न पांडे,जयंत माहुरकर, अमोल पाटील, युवा मोर्चाचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष भैय्या महाजन, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सुमित बऱ्हाटे, अनिरुद्ध कुलकर्णी , प्रा धीरज पाटील, गिरीश पाटील, डॉ पवन सरोदे, कैलास शेलोडे,सुनील सोनवणे, समाधान पवार, दिलीप नेमाडे, दिलीप कोळी, संजय बोचरे,ॲड हरेश कुमार पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे धनराज बाविस्कर, शंकर शेळके ,राहुल तायडे , रवींद्र दाभाडे,संतोष टोकळ, कुणाल येवले, चेतन सावकारे,योगेंद्र हरणे, गोपी सिंह राजपूत, नंदकिशोर बडगुजर, लखन रणधीर,अतुल गोसावी, यशांक पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे सज्जाद शेख, रेहमान शेख, विजय डोंगरे, सागर जाधव,यश बढे यांच्या सह भुसावळ शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.