जळगाव प्रतिनिधी । येथील भरारी फाउंडेशनतर्फे शहरात ‘ग्रीन सिटी’ अभियान राबविण्यात येत असून, याअभियानांतर्गत महाबळ परिसरात देवेंद्र नगरातील परिसरात ५० रोपांचे वृक्षारोपण ट्री गार्डसह करण्यात आले आहे.
यावेळी निंब, करंज, वड, पिंपळ आदी रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपक्रमासाठी उद्योगपती रजनीकांत कोठारी, नवजीवन सुपर शॉपीचे अनिल कांकरिया यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी फाउंडेशनचे दीपक परदेशी, अक्षय सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सुनील जावळे, मोहिनीराज कुलकर्णी, महेश पाटील, जयंत शिरसाठ, स्वप्नील वाघ, दिपक जोशी, भूपेश कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी, मोहित पाटील, डॉ. राहुल सोनवणे, महेंद्र सोनार, गोपाळ कापडणे, राजेश मलिक, रवींद्र बामंदे, वृक्ष संवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. तसेच भरारी फाउंडेशन राबवित असलेल्या ‘ग्रीन सिटी’ अभियानांतर्गत 1 हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी यावेळी सांगितले आहे.