भंडारा प्रतिनिधी । येथील जिल्हा रूग्णालयाच्या नवजात शिशूकेअर युनिटला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर, या दुर्घटनेमुळे आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्यात आल्याचे दिसून येत आहे.
भंडारा येथील जिल्हा रूग्णालयातला नवजात शिशूकेअर युनिटला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. यात धुरामुळे गुदमरून दहा बालके दगावली आहेत. तर उपस्थितांनी धावपळ करत सात शिशूंचे प्राण वाचवले आहेत.
जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा भयंकर प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेची माहिती जाणून घेतली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे राज्य हादरले असून आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्यात आल्याची टीका करण्यात येत आहे.