नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अपघातात कुटुंबातील लोक मृत्यूमुखी पडल्याचे सांगून आमदाराकडून सहा हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. हा प्रकार नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या सोबत घडला आहे. फसवणूक करणाऱ्या तो त्यांच्या मतदारसंघातील रहिवाशी सांगून त्यांची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आमदार कृष्णा खोपडे हे मुंबई येथे असताना त्यांना एक फोन आला. फोनवर त्यांना फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मुंबईजवळ ठाण्यात रस्ते अपघातात त्यांच्या परिवारातील दोन सदस्य मृत्युमुखी पडले. मी तुमच्या मतदारसंघाचा रहिवासी आहे, रुग्णवाहिकेच्या भाड्यासाठी खोपडे यांच्याकडे फोनवर 6 हजार रुपये मागितले. आपल्याच परिसरातील नागरिक अडचणीत आहे हे विचार करून आमदार खोपडे यांनी मदत म्हणून तातडीने ऑनलाईन सहा हजार हजार रुपये पाठविले. आमदार खोपडे नागपूरला परत आल्यावर संबंधित कुटुंबाची विचारपूस केल्यावर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आमदार कृष्णा खोपडे यांनी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. आतापर्यंतच्या पोलीस तपासात आरोपी ठाण्यातील रहिवाशी असल्याचे समजले असून त्याचे नाव प्रवीण कडू आहे. पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरु आहे.