भालशिव पिंप्री शेतशिवारात बिबट्याचा संचार; नागरीकांमध्ये भिती ( व्हिडीओ )

biblty news

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील भालशिव पिंप्री सेकम या गाव शिवारातील रस्त्यावर मुक्त संचार करतांना बिबट्या दिसुन आल्याने या परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटया असल्याची माहीती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसरातील जंगल व मळ्यात पाहणी केली मात्र बिबट्या हाती आला नाही.

 

या संदर्भात वनविभाग पुर्वचेवनक्षेत्र पाल व्ही.एम. पाटील यांनी दिलेली माहीती अशी की यावल पासुन सुमारे पाच ते सहा किलोमिटर लांब असलेल्या पिंप्रीसेकम या गाव शिवारात बिबटया दिसुन आल्याचे दुरध्वनीवरुन पिंप्री गावातील एका शेतकऱ्याकडुन माहिती मिळाली. या विषयाचे गांर्भीय लक्षात घेवुन तात्काळ आमचे वरिष्ठ उपवनसंरक्षक वनविभाग यावल प्रकाश मोराणकर व सहाय्यक वनसंरक्षक आर.जे. राणे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गस्तीपथक एस. आर. पाटील, वनपाल आर. बी. नोनवणे, वनरक्षक रुबाब एस. तडवी, वनपाल के.पी. शेळके, वनपाल जी.बी. डोंगरे, वनपाल आर.एस. काटे, वनपाल जिवन नागरगोजे आणि नंदुवंजारी यांच्या पथकाने तात्काळ पिंप्रीसेकम गावाचा संपूर्ण परिसरत पिंजून काढला. मात्र बिबटया मिळुन आला नाही.

शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी दाखवलेल्या मार्गावर पाहणीत बिबटयाच्या पायाचे ठसे मिळुन आले असल्याचे सांगीतले. साधारण हा बिबटया अडीच वर्षा असावा असे पायाच्या ठसेवरून वनविभागाने हा बिबट्या अडीच वर्षाचा असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. या परीसरात बिबटयाचा वावर असल्याचे सिद्ध झाले असुन आपण परिसरातील गावकऱ्यांना काही सुचना दिल्या. सकाळी ६ ते ११ च्या दरम्यान व सांयकाळी ५ वाजेनंतर कुणीही जंगलात जावु नये विशेष करून आपण लहान मूलांना गावा बाहेरच्या परिसरात जावु देवु नये किंवा एकटे फिरू देवु नये अशा आवश्यक काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहे.

बिबट्याचा शोध घेण्यासाठी पथक तळ ठोकून
बिबट्याचा शोध आमचे पथक पुन्हा संध्याकाळी त्याच परिसरात जावु घेणार असल्याचे व्ही.एम. पाटील यांनी पुढे सांगीतले की सदर चा बिबटया साधारण आठ दिवसापुर्वी सुकदेव भोलाणे या जंगलात दिसुन आला होता यावेळी आमच्या एका वनकर्मचाऱ्यास पंजा मारून जखमी केले होते हाच तो बिबटया असावा असे त्यांनी सांगीतले , बिबटया हा यावल शहरा पासुन ६ते ७ किलोमिटर लांब पिंप्रीसेकम हडकाई नदीच्या खोऱ्यात तो मिळुन येण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली असुन याबाबत पारिसरातील बोरावल, टाकरखेडा, निमगाव, प्रसंगी यावल शिवारात देखील बिबटया येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने परिसरातील जनतेला सावधान राहण्याच्या सुचना दिल्या आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात येईल असे वनविभागाकडुन सांगीतले गेले आहे.

 

 

Add Comment

Protected Content