यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील ग्रामपंचायत सांगवी बु|| गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोणातुन १५ व्या वित्त- आयोगाच्या ‘सन २०२३=२४ या आर्थिक वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात २२ नोव्हेंबर २०२२’ रोजी गावाची ग्रामसभा संपन्न झाली.
या ग्रामपंचायतच्या कार्यालयात पार पडलेल्या या ग्रामसभेत गावातील ग्रामस्त अॅड.शरद भागवत तायडे (भाजपा युवा मोर्चा यावल तालुका उपाध्यक्ष) यांनी लेखी स्वरूपात सर्व सभागृहासमोर संपूर्ण गावाचा विकास कशाप्रकारे या १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून करता येईल. अशी ब्ल्यू प्रिंट सादर केली. यामध्ये गावाचा सर्वांगीण विकास संदर्भात मुद्दे मांडण्यात आले. सदर ब्ल्यू प्रिंट मधील मुद्दे ग्रामसभेत वाचून दाखवण्यात आले.
त्यावर सर्व गावकऱ्यांनी मुद्दे विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असून त्याचा १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात समावेश करण्यात यावा अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सदरील ब्लू प्रिंट शेतकरी, महिला वर्ग, तरुण वर्ग, जिल्हा परिषद मुला-मुलींची शाळा, आरोग्य केंद्र यांना समोर ठेवून तयार करण्यात आली. तसेच गावात दशक्रिया विधी साठी गावातील ग्रामस्थांची इतरत्र फिराफिर होते त्यानुशंगाने गावात पूर्वीच बांधण्यात आलेला दशक्रिया सभामंडप/ओटा दुरुस्त, साफसफाई, नळ जोडणी करुन चालू करणे संदर्भात देखील अर्ज देण्यात आले. यावेळी गावाचे ग्रामसेवक, सरपंच, काही सदस्य,आंगनवाडी सेविका, आशावर्कर, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद शाळाचे मुख्याध्यापक,आरोग्य सेवक व ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग मोठया संख्येत उपस्थित होता.