Home Cities चोपडा भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवनिमित्ताने मोटारसायकल रॅली

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवनिमित्ताने मोटारसायकल रॅली

0
46

WhatsApp Image 2019 04 16 at 3.15.18 PM

चोपडा (प्रतिनिधी) भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणक महोत्सव निमित्ताने शहरात सकल जैन समाजातर्फे भव्य मोटारसायकल रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली.  मंगळवार १६ रोजी सकाळी ९ वाजता शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीची सुरुवात ग्रामीण पोलीस स्टेशन समोर पासून करण्यात आली.

 

शेकडो मोटारसायकलवर सकल जैन समाजाचे लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्व नवयुवक, युवती स्वार झाल्या होत्या.  मोटारसायकल रॅलीत सहभागीं सर्व सकल जैन समाज बांधवांनी  फेटे बांधले होते. यावेळी युवतीनी देखील फेटे परिधान केले होते. तसेच सफेद ड्रेस परिधान करून शिस्तबद्ध एका ओळीत मोटारसायकल रॅली काढण्यात आल्याने गावातील लोकांनी कौतुक केले.  भगवान महावीर स्वामींचा संदेश “जिओ ओर जीने दो” “वंदे – विरम” “शुध्द आहार शाकाहार” अश्या विविध घोषणा मोटारसायकल रॅलीत देण्यात आल्या.  रॅली चिंच चौक,  श्रीजी चौक,  गोलमंदिर,  मेन रोड,  आंबेडकर चौक,  शिवाजी चौक तर म्युनिसिपल शाळेचा प्रांगणावर समारोप करण्यात आले.  नवकार फूड्स & एजंन्सी यांच्या तर्फे ५०% सवलीत आईस्क्रीम वाटप करण्यात आले. रॅली यस्वीतेसाठी सकल जैन समाजाच्या नवयुवकांनी कामकाज पहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound