मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
पहाटेच्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यपालांवर प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे कोश्यारी यांची दुसऱ्या राज्यात उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण महाराष्ट्रातून हातची सत्ता गमावल्यानंतर केंद्राकडून प्रतिमा सुधारण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार भगतसिंह कोश्यारींच्या जागी राजस्थानच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणाऱ्या कलराज मिश्र यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.