भडगाव (प्रतिनिधी) येथील बुथ क्रमांक १०७ वर आज सकाळी सात वाजेपासून पुनर्मतदानास प्रारंभ करण्यात आला होता. दुपारी १ वाजेपर्यंत याठिकाणी 28.46 टक्के मतदान झालेले होते.
२३ एप्रिलला झालेल्या मतदानाच्या दिवशी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे मतदान क्लिअर न करता मतदान प्रक्रिया पार पाडली गेली होती. शिवाय तीन मतदान जास्तीचे आढळून आल्यामुळे येथील मतदान प्रक्रिया रद्द करून केंद्रावर पुन्हा मतदान घेतले जात आहे. या अनुषंगाने बुथ क्रमांक १०७ वरील १३८२ मतदार लोकसभेसाठी दुसऱ्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. आज सकाळी ७ वाजेपासून मतदानास प्रारंभ करण्यात आला. सकाळपासून याठिकाणी काही अंशी संथगतीने मतदान सुरु आहे. कारण पहिल्या दोन तासात याठिकाणी अवघे 9 टक्क्के मतदान झाले होते.