भडगाव प्रतिनिधी । येथील तहसीलदार सागर ढवळे यांनी शहरातील काही रेशन दुकानांना सरप्राईज व्हिजीट देऊन स्टॉकची पाहणी केली. यात काही ठिकाणी अनियमितता आढळल्याचे संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार आहे.
येथील तहसीलदार सागर ढवळे यांनी शहरातील रेशन दुकानास अचानक भेटी देवुन तपासणी केली. यात रेशन दुकानातील रेटबोर्ड, स्टाक रजिस्टर, विक्री रजिस्टरची पहाणी केली. शहरातील एका रेशन दुकानावर ग्राहकांनी तक्रारी केल्याचे समजते.
सागर ढवळे यांनी तालुक्यातील रेशन दुकानदार याची बैठक घेऊन तरतुदी चे पालन करण्याबाबत कायदेशीर सुचनाचे पालन करुन रेशन वाटप करण्यात रेशन दुकानदार यांना सुचना देवुन रेशन दुकानातील काळाबाजारला आळा बसविण्यासाठी दुकानदारानी बाहेर दर्शनी भागी माहिती फलक व माल घेतल्याची पावती देणे. शिल्लक माल तपशील. धान्ये दिलेल्या ग्राहकांची यादी लावणे सह माहीती नागरीकांना वाचता येईल अश्या दर्शनी भागी लावण्याची सुचना दोन दिवसापुर्वीच रेशन दुकानदार यांना दिल्या आहेत.
या सुचनाची अंमलबजावणी रेशन दुकानदार करतात की नाही यांची खातरजमा करण्यासाठी तहसीलदार सागर ढवळे यांनी शुक्रवारी शहरातील रेशन दुकानदार यांना अचानक भेट देवुन पहाणी केली. यात मेनरोड लगत असलेल्या बाळकृष्ण कोंडु वाणी व बाजारातील शितल मागासवर्गिय बचत गट यांच्या रेशनदुकानास भेट देवुन तेथिल रेटबोर्ड, स्टाक रजिस्टर, विक्री रजिस्टरची पहाणी करत दप्तर तपासणी केली. तसेच मयत लाभार्थी कमी केले नसल्याचे आढळुन आले. दिलेल्या सुचनाची अंमलबजावणी होत नसल्याने रेशन दुकानदार विरुध्द कारवाईचा इशारा दिला. यावेळी एका रेशन दुकानात महिला ग्राहकांने माल मिळत नाही अशी तक्रार केली. याबाबत महिलेचा जबाब घेतला असल्याचे समजते.
दरम्यान, रेशनकार्ड धारक ग्राहकांना अंत्योदय योजने अंतर्गत ३५ कीलो धान्य लाभार्थीस दिले जाणार आहे. यात गहु- १०, तांदुळ-१०, मका-१३, ज्वारी-१ बाजरी-१ किलो धान्य तसेच प्राधान्यक्रम अंतर्गत गहु-३ तादुळ-२ कीलो धान्य प्रति लाभार्थी प्रमाणे मिळणार आहे. मे महिन्यात धान्य मोफत तर साखर रोखीने मिळणार आहे. जुन महिन्यात दोन्ही योजनेतील लाभार्थीना रोखीने रेशन मिळणार आहे. पंतप्रधान योजनेच्या (पीएमकेजीवाय) अंतर्गत पांढरे व केसरी कार्ड धारक वगळता सर्व लाभार्थीना मे व जुन महिन्यात प्रती लाभार्थी गहु-३, तांदुळ-२ असे मोफत मिळणार आहे. तसेच प्रत्येक लाभार्थीने रेशन घेतल्यानंतर रितसर धान्य घेतल्याची पावती रेशन दुकानदाराकडुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार सागर ढवळे व पुरवठा निरीक्षक किशोर महाले यांनी केले आहे.