भडगाव प्रतिनिधी । येथिल मोटर सायकल चोरी प्रकरणी ताब्यात असलेल्या दोन आरोपीनी इतर चोरी केलेल्या सहा मोटर सायकली काढुन दिल्या असून त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील पाटील वाडा येथून घरासमोर लॉक केलेली बजाज प्लाटिना ही मोटारसायकल चोरी झाली होती. या बाबत पोलिस स्टेशनला अज्ञात विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलिस नाईक प्रल्हाद शिंदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे, पोलिस नाईक लक्ष्मण पाटील, नितीन रावते, पोका ईश्वर पाटील, स्वप्निल चव्हाण यांच्या पथकाने फागणे (धुळे) येथे मोटर सायकल विक्री करत असताना आरोपी अजय दिगंबर जाधव (वय २४) रा. खालची पेठ, व पप्पू ऊर्फ गणेश आनंदा माळी (वय २८) रा. जकातदार गल्ली भडगाव यांना मोटारसायकल सह ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती.
दरम्यान, पोलीस कस्टडीत असताना आरोपी अजय जाधव व पप्पु ऊर्फ गणेश आनंदा माळी यांनी गुन्हात चोरी गेलेली मोटर सायकल व्यतीरीक्त इतर गुन्ह्यात चोरी केलेल्या अन्य सहा मोटर सायकली तपास अधिकारी यांना काढुन दिल्या आहे. या सहा मोटर सायकल पैकी तीन बाईक या शहरातील असुन चोरी प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. तर अन्य तीन अन्य ठिकाणाहुन चोरी केलेल्या आहेत. चोरी केलेल्या मोटर सायकली आरोपीनी कमी किमतीत विक्री केल्या असल्याची कबुली दोन्ही आरोपीनी दिली आहे.
संबंधीत गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागिय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात येत असुन आरोपी कढुन अन्य गुन्हाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.